Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशात दूध का आटवले जाते? कोजागिरी पौर्णिमेचे...

शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशात दूध का आटवले जाते? कोजागिरी पौर्णिमेचे शास्त्रीय आणि आध्यात्मिक महत्त्व

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई : आज शरद पौर्णिमा आहे. याला आपण कोजागिरी पौर्णिमासुद्धा (Kojagiri Purnima) म्हणतो. कोजागिरी म्हंटल की डोळ्यासमोर येते ते आटवलेल्या घट्ट दुधाने भरलेला पेला, भुलाबाईचे गाणे, घरच्या मोठ्या मुलाचे औक्षवण आणि धम्माल मस्ती कोजागिरी पौर्णिमेला दरवर्षी हिवाळ्याची सुरूवात होते. निरभ्र आकाशात चांदण्यांच्या प्रकाशात काजु, बदाम आणि चारोळ्या टाकून दुध आटवले जाते. या पद्धतीला आध्यात्मिक महत्त्व तर आहेत पण यामागे शास्त्रीय कारणही आहे. कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यामागे दोनीही दृष्टीकोनातून आपण महत्त्व जाणून घेऊया.

कोजागिरी पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात दूध आटवण्यामागचे शास्त्रीय कारण

कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा पृथ्वीच्या जवळ असतो. चंद्राच्या प्रकाशात विशेष सकारात्मक उर्जा असते. या दिशी रात्री चंद्राच्या प्रकाशात दुध आटवल्याने त्याची किरणे दूधात पडतात. हिवाळ्याची सुरूवातीच्या काळात शरद पौर्णिमा येते. ऋतू बदल झाल्यानंतर अनेक संक्रमीत आजार बळावतात. तसेच आपल्या या काळात आपल्या शरिराला विशेष उर्जेची गरज असते. चंद्राच्या प्रकाशात आटवलेले दुध पिल्याने रोगप्रतीकारक शक्ती वाढते. या निमीत्त्याने मित्र मंडळी आणि परिवारातील सदस्य एकत्र येतात. भेटीगाठी होतात. त्यामुळे याला सामाजीक दृष्टीकोणातूनही महत्त्वाचे मानले जाते.

कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व

पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता, त्यामुळे ही तिथी धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली जाते. या दिवशी श्रीकृष्ण अवतार, धनाची देवी लक्ष्मी आणि सोळा कलेच्या चंद्राची पूजा केल्याने विविध वरदान प्राप्त होतात. शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या दिवशी चंद्रप्रकाश सर्वात तेजस्वी असतो. या दिवशी चंद्रप्रकाशातून अमृतवृष्टी होते, या श्रद्धेमुळे लोकं दूध आटवून ती चंद्रप्रकाशात ठेवतात, जेणेकरून चंद्राची किरणे त्यात पडतील. हे दूध सर्वांना प्रसाद म्हणून दिले जाते. यावेळी शरद पौर्णिमा 28 ऑक्टोबर म्हणजेच आज आहे.

दूध आटवताना या गोष्टीची काळजी घ्या

शरद पौर्णिमेच्या रात्री दूध आटवणे खूप शुभ मानले जाते. ज्योतिषांच्या मते ग्रहणाचा सुतक कालावधी सुरू होण्यापूर्वी दुध आटवावे. या दिवशी सुतक सुरू होण्यापूर्वी दुधात तुळशीची पाने टाकावीत. चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी तुम्ही ही दूध चंद्रप्रकाशात ठेवू शकता. पण, लक्षात ठेवा की ग्रहण सुरू होण्यापूर्वी ते घरात घेऊन यावे.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments