Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजशरद पवार यांच्या गुगलीवर अजित पवार यांचा चौकार

शरद पवार यांच्या गुगलीवर अजित पवार यांचा चौकार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

दौंड – ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांचे दौंड शहरातील जुने खंदे सहकारी व सध्या भाजपशी जवळीक असणारे दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख किसनदास कटारिया यांची तब्बल सात वर्षांनी भेट घेऊन विरोधकांसाठी गुगली टाकली होती. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या गुगलीवर चौकार मारीत प्रेमसुख कटारिया यांच्या घरी भेट घेत त्यांना लोकसभा उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचारात सक्रिय करून घेतले आहे.

दौंड नगरपालिकेचे सलग ५० वर्षे नगरसेवक असणारे आणि दोन वेळा दौंड विधानसभा निवडणूक लढविणारे प्रेमसुख कटारिया यांची ७ एप्रिल रोजी दौंड शहरात भेट घेतली होती. शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रेमसुख कटारिया यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली होती.

प्रेमसुख कटारिया हे सध्या कोणत्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी नसले तरी दौंड मतदारसंघाचे भाजप आमदार राहुल कुल यांचे तालुक्यातील राजकीय मार्गदर्शक म्हणून मोठी भूमिका बजावत आहेत. दरम्यान १७ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ दौंड शहरात डॉक्टर व वकिल बांधवांशी एका बैठकीत संवाद साधला.

या बैठकीत अजित पवार यांच्या सुचनेनुसार प्रेमसुख कटारिया यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले. बैठकीनंतर अजित पवार यांनी प्रेमसुख कटारिया यांच्या घरी भेट देत त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. आमदार राहुल कुल व दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे या वेळी उपस्थित होते. कुटुंबीय आणि पदाधिकारी यांच्यासमोर झालेल्या विस्तृत चर्चेनंतर प्रेमसुख कटारिया हे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सक्रिय झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments