Tuesday, January 14, 2025
Homeक्राईम न्यूजशरद पवार गटात प्रवेश केल्याने चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला; हल्ला केल्याची दिली...

शरद पवार गटात प्रवेश केल्याने चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला; हल्ला केल्याची दिली कबुली, दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : विश्रांतवाडी परिसरात माजी नगरसेवक चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) पक्षात प्रवेश केल्यामुळे हा हल्ला करण्यात आला असे निष्पन्न झाले आहे. टिंगरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली.

याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीसांनी रेवण तानाजी लगस (वय-20, रा. गोकुळ नगर, कात्रज) प्राणजीत अच्युत शिंदे (वय-24. रा. हांडेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी चंद्रकांत टिंगरे यांच्या पत्नी माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी फिर्याद दिली होती.

धानोरी प्रभागाच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे आणि त्यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीत टिंगरे दांपत्याने सुरुवातीला महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांना पाठिंबा दिला होता. निवडणुकीचा प्रचार सुरू असताना रेखा टिंगरे आणि चंद्रकांत टिंगरे यांनी पक्षांतर करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करून बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा जाहीर केला होता.

कसा झाला हल्ला ?

चंद्रकांत टिंगरे आणि त्यांचे चालक (दि. 19 नोव्हेंबर) रोजी धानोरी महावितरण कार्यालयासमोर गाडीत बसले होते त्यावेळी दोन जणांनी त्यांची गाडी अडवली. त्यादरम्यान, त्यांच्या गाडीवर दगडफेक करून मारहाण करण्यात आली, अशी तक्रार रेखा टिंगरे यांनी दिली होती. महायुतीचे उमेदवार आणि आमदार सुनील टिंगरे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या पतीवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप रेखा टिंगरे यांनी केला होता. त्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांनी हल्ला करणा-या दोन आरोपींना अटक केली आहे.

याप्रकरणी दोन आरोपींनी अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी हल्ल्याचे कारण सांगताना राष्ट्रवादी (अजित पवार गट) सोडून राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षात प्रवेश केल्यामुळे दगडफेक केल्याचे कबूल केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments