Friday, April 19, 2024
Homeक्राईम न्यूजव्यावसायिकाला कमी दरात साखर देण्याच्या आमिषः दोघांनी घातला 45 लाखांचा गंडा; कोथरुड...

व्यावसायिकाला कमी दरात साखर देण्याच्या आमिषः दोघांनी घातला 45 लाखांचा गंडा; कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

एका किराणा माल व्यापाऱ्यास कमी दरामध्ये मोठ्या प्रमाणात साखर देण्याचे आमिष दाखवून संबंधित व्यापाऱ्याची तब्बल 45 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात सांगली येथील दोन आरोपींच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.

याप्रकरणी स्वाद फूडस प्रा. लि. चे संचालक विक्रम दिनकर पाटील (वय -४१), दिग्विजय दिनकर पाटील (वय-३८, दोघे रा अजिंक्यनगर, सांगली) या आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुनील शिवारामजी गेहलोत (वय- ३८, रा. सखाई प्लाझा, भेलकेनगर, कोथरुड, पुणे) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार सुनील गेहलोत यांचे कोथरुडमधील भेलकेनगर परिसरात बालाजी ट्रेडिंग कंपनी किराणा माल विक्री दुकान आहे. आरोपी पाटील यांनी साखर कारखान्याकडून स्वस्तात साखर मिळवून देतो, असे आमिष गेहलोत यांना दाखविले होते. गेहलोत यांना १५० टन साखर पुरवठा करून देतो, असे सांगून त्यांच्याकडून ४५ लाख रुपये घेतले.

सुनील गेहलोत यांनी ऑनलाइन पद्धतीने आरोपी पाटील यांच्या खात्यात वेळोवेळी ४५ लाख रुपये जमा केले. त्यानंतर पाटील यांनी त्यांना साखर दिली नाही. त्यामुळे त्यांनी पाटील यांच्याकडे वारंवार साखर देण्याबाबतची मागणी केली. मात्र, तक्रारदार यांना कोणतेही उत्तर देण्यास पाटील टाळाटाळ करू लागले . त्यामुळे आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गेहलोत यांनी पोलिसांकडे आरोपी विरोधात तक्रार दिली. कोथरूड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर याबाबत पुढील तपास करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments