इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या मुलाला पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली. अटकेनंतर भारतीय जनता पक्ष शहर महिला आघाडीच्यावतीने पुण्यातील आरोपी राजेंद्र हगवणे व त्याचा मुलगा शशांक हगवणे यांच्याविरुद्ध शिवाजीनगर कोर्ट परिसरात आंदोलन केलं. पिता-पुत्राला पोलिसांनी अटकेनंतर आज दुपारी न्यायालयात हजर केलं. न्यायालयाकडून पिता-पुत्रास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, भाजपच्या महिला आघाडीने हर्षदा फरांदेंच्या नेतृत्वात हगवणेंच्या बॅनरला चप्पलने मारहाण करत कोर्टाबाहेर मोठी घोषणाबाजी केली. या आंदोलनाची माहिती मिळताच न्यायालयासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या पिता-पुत्रांस किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दोघांनाही न्यायालयाकडून 28 मेपर्यंत म्हणजेच 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.