इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः वैष्णवी हगवणे प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपींना आज (२८ मे) रोजी कोर्टात हजर केलं. न्यायालयाने नवरा शशांक हगवणे, नणंद करिश्मा हगवणे आणि सासू लता हगवणे यांना एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. तर राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे यांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. दरम्यान, आज (२८ मे) रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयात हगवणेच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेत टिप्पणी केली आहे. झालेल्या सुनावणीत वैष्णवी एका व्यक्तीसोबत चॅट करत असल्याचे आणि तिचे चॅटिंग पकडले असल्याचा दावा हगवणेच्या वकिलांनी केला आहे.
या प्रकरणात हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावरच संशय घेत टिप्पणी केली. यावेळी वैष्णवी आत्महत्याच करण्याच्या मानसिकतेत होती, असा गंभीर दावा हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी केला आहे.
दरम्यान, हगवणेच्या वकीलाने न्यायालयात युक्तिवाद केला की, वैष्णवी नको त्या व्यक्तीसोबत चॅट करत होती. वैष्णवी करत असलेले चॅटिंग पकडले होते. ज्या व्यक्तीबरोबर ती चॅट करत होती त्या व्यक्तीने नकार दिल्यामुळेच वैष्णवीने आत्महत्या केली आहे. ती चॅटिंग करत असलेल्या मुलाचा 18 तारखेला साखरपुडा झाला. तपास अधिकाऱ्याला ती चॅटिंग करत असलेल्या व्यक्तीचे नाव देण्यात आले आहे.
हगवणेचा वकील पुढे म्हणाले की, वैष्णवीची प्रवृत्ती सुसाईड करण्याची होती. तिने अनेकवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. एकदा रेंट पॉइझन खाऊन आणि एकदा गाडीतून उडी मारूनही तिने जीवन संपवण्याचा प्रयत्न केलेला होता. ज्या व्यक्तीसोबत ती चॅट करत होती त्याने नकार दिला असेल म्हणून तिने नैराश्यात जाऊन टोकाचे पाऊल उचलले आहे.