Sunday, May 19, 2024
Homeक्राईम न्यूजवैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक

वैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

हडपसर : येथील महात्मा फुलेनगर वैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक झाल्या. आज सकाळी पावने सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही लागल्याचा प्राथमिक अदांज अग्नीशामक दलाने व्यक्त केला आहे.

येथील झोपडपट्टीत आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली. त्यानुसार हडपसर, बी. टी. कवडे, काळे बोराटेनगर फायर स्टेशन दलातील फायर गाड्या घटना स्थळी पोहचल्या. घटना स्थळी झोपड्यांपर्यंत जाण्यास कोणताही मार्ग नसल्याने शिडीच्या साह्याने ब्रिज वरून खाली उतरून आगीवर जेट व स्प्रे पद्धतीने पाण्याचा मारा सुरु करण्यात आला. तसेच, फायर गाडीच्या पंपापासून होजच्या दोन रांगा तयार करून आगीवर सतत पाण्याचा मारा चालू ठेवून संपूर्ण आग आटोक्यात आणण्यात आली.

आगीमध्ये रेहाना आसिफ शेख, सलीम मुबारक शेख, कल्लू मुबारक शेख व चांद मुबारक शेख यांच्या झोपड्यांमधील इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्य जळून खाक झाले. आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही, अशी माहिती अग्निशमन दलाचे स्टेशन ड्यूटी अधिकारी प्रमोद सोनवणे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments