Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजवेल्हे येथे ९ वर्षीय बालिकेवर मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला अटक; पोस्को...

वेल्हे येथे ९ वर्षीय बालिकेवर मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला अटक; पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वेल्हे : वेल्हे बुद्रुक (ता. राजगड) येथे ९ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या युवकावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून वेल्हे पोलिसांनी काल शनिवारी (ता.३०) रोजी अटक केली असुन विशाल उर्फ सोन्या दत्तात्रय कोंढाळकर (वय २० रा. पवारमाळ, वेल्हे बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून न्यायालयाने त्याला ३ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत अधिक माहिती देताना वेल्हे पोलिस म्हणाले, १७ मार्च रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वेल्हे बुद्रुक येथील सोनवणे आळी जवळील एका भात खाचरातील उंबराच्या झाडाखाली हा प्रकार घडला.

आरोपी विशाल कोंढाळकर याने पिडित बालिकेच्या अज्ञातपणाचा फायदा घेवुन तिला जबरदस्तीने ओढत झाडाखाली आणले. तेथे तिच्या अंगावरील कपडे अर्धवट काढुन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. मोबाईल मध्ये व्हिडिओ शुटींग केले.

हा प्रकार कोणास सांगितल्यास व्हिडिओ तुझ्या पपांना व आत्याला दाखवण्याची धमकी दिली. या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आप्पासाहेब पडळकर तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments