इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी LIC अनेकनव्या आणि महत्त्वपूर्ण योजना आणत असते. त्यात आता LIC ने आपली नवीन पेन्शन योजना ‘स्मार्ट पेन्शन योजना’ लाँच केली आहे. ही योजना पूर्ण, फ्लेक्झिबल आणि सुरक्षित पेन्शन सोल्यूशन मिळत आहे. ही योजना वेगवेगळ्या आर्थिक स्थितीनुसार बनवण्यात आली आहे. त्यामुळे सेवानिवृत्त व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांना नियमित उत्पन्न मिळत राहील.
LIC ची स्मार्ट पेन्शन योजना ही एक नॉन-पार, नॉन-लिंक्ड, वैयक्तिक/समूह, बचत आणि तत्काळ उत्पन अशी वार्षिकी योजना आहे. हे सेवानिवृत्तीच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केली गेली आहे. ही एक सिंगल लाईफ आणि जॉइंट लाईफ अॅन्युइटी या दोन्हीसाठी विविध पर्याय उपलब्ध करून देत आहे. स्मार्ट पेन्शन योजना ही एक नॉन-पार प्रॉडक्ट आहे. या योजनेसाठी किमान वय 18 वर्षे असणे गरजेचे आहे. तर जास्तीत जास्त वय 65 आणि त्यापुढे काही वर्षे असणार आहे. पण, यामध्ये सिलेक्टेट वार्षिकी पर्यायावर काही गोष्टी अवलंबून असणार आहे. यामुळे ही योजना अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकते.
यामध्ये पॉलिसीधारकांना दोन पर्याय मिळतात. सिंगल लाईफ अॅन्युइटीच्या माध्यमातून लाईफटाईमसाठी अॅन्युइटी पेमेंट मिळवून देते. तसेच ही योजना विविध आर्थिक गरजा आणि सेवानिवृत्तीची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे या सर्व सुविधेचा फायदाही मोठ्या प्रमाणात घेता येऊ शकतो.