इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
सासवडः श्री क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवाची यात्रा 11 ते 23फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. या यात्रेच्या अनुषंगाने तहसीलदार विक्रम राजपूत यांनी सासवड येथील नवीन तहसील कचेरीत आढावा बैठकीचे आयोजन केले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे, सासवड पोलिस ठाण्याचे निरीक्षक ऋषिकेश यांच्या उपस्थितीत हि बैठक पार पडली.
राज्यातील भाविक या सोहळ्याला हजेरी लावतात. सोहळ्यामध्ये पालखी छबिना, तसेच भाविकांच्या सोयीसाठी, मंदिरातील धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन कसे असेल याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या वेळी श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान वीरच्यावतीने राजेंद्र धुमाळ, अमोल धुमाळ, तानाजी धुमाळ, श्रीकांत थिटे, काशिनाथ धुमाळ, संग्राम धुमाळ, कोडीत देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब बडदे, अनिल बदडे, उपसरपंच प्रमोद बडदे, योगेश बडदे, अशोक बडदे, गणेश बडदे उपस्थित होते.
देवाची यात्रा पारंपरिक पद्धतीने सर्व रीतिरिवाज पाळून पार पाडल्या जाव्यात, श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थानतर्फे आवाहन यात्रा कालावधीत वीरमध्ये बैलगाडीने येण्याची प्रथा असून गाड्यांची संख्या आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी पाहता कोणताही बैलगाडा किंवा बैल मंदिर परिसरमध्ये आणण्यास बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, येणाऱ्या भाविकांना आरोग्य, स्वच्छ पाणी आणि इतर व्यवस्था करण्यात आली आहे. कोणतेही वाद उत्पन्न होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच यात्रा शांततेत पार पाडण्याचे शासनाचे वतीने आवाहन करण्यात आले. यावेळी सर्व विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.