Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजवीजपुरवठा खंडित केल्याचा राग, थकबाकीदाराकडून महावितरणच्या जनमित्रास मारहाण, गुन्हा दाखल

वीजपुरवठा खंडित केल्याचा राग, थकबाकीदाराकडून महावितरणच्या जनमित्रास मारहाण, गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : वीजबिलाच्या थकबाकीमुळे वीजपुरवठाखंडित करण्यात आलेल्यांतर परस्पर वीजपुरवठा घेणाऱ्या थकबाकीदाराने महावितरणच्या जनमित्रास लोखंडी पाइपने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. हवेली तालुक्यातील तुपेवस्ती येथे सोमवारी (दि. १०) ही घटना घडली. या घटनेत जखमी झालेल्या जनमित्राला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका आरोपीविरुद्ध ऊरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणकडून ही माहिती देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणच्या उरुळी कांचन उपविभागांतर्गत वरिष्ठ तंत्रज्ञ नीलेश चाकणे व विद्युत सहायक शहाबाज शेख हे तुपेवस्तीमधील साईनगर परिसरात थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करत होते. या वेळी थकबाकीमुळे वीजग्राहक प्रकाश परदेशी यांच्या मालकीच्या घराचा वीजपुरवठा २३ जानेवारीला खंडित करण्यात आला होता. मात्र, त्या ठिकाणी परस्पर वीजपुरवठा घेण्यात आल्याचे तपासणी करताना उघड झाले होते.

या प्रकरणात कारवाई करताना भाडेकरू कमलेश उत्तम लोंढे याने अंगावर धावून आला आणि ‘खंडित वीजपुरवठा सुरु केला, तर तुम्ही विचारणारे कोण’ असे म्हणत दोन्ही कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच तो एवढ्यावर न थांबता त्याने लोखंडी पाइपने मारहाण केली. या घटनेत चाकणे यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे, असेही महावितरणकडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments