Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज विश्रामबाग पोलिसांची कारवाई: पुण्यात भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी यांच्यावर फसवणुकीचा...

विश्रामबाग पोलिसांची कारवाई: पुण्यात भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी यांच्यावर फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उदय जोशी, त्यांचा मुलगा आणि निनाद नागरी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पतसंस्था मधील एका ग्राहक जामीनदाराची बनावट स्वाक्षरी करून ७७ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून आर्थिक फसवणुक केल्या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी तानाजी दिनकर मोरे (वय ४२, रा. तुकाईनगर, वडगाव बुद्रुक) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार याबाबत भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उदय त्र्यंबक जोशी (वय ६५), त्यांचा मुलगा मयुरेश (वय ४६, दोघे रा. पानमळा, सिंहगड रस्ता, पुणे), निनाद नागरी पतसंस्थेचे कोषाध्यक्ष रामलिंग शिवगणे आणि सचिव अशोक कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी माजी नगरसेवक उदय जोशी आणि त्यांचा मुलगा मयुरेश यांची गॅस एजन्सी आहे. संबधित गॅस एजन्सीत पैसे गुंतविल्यास अल्पकाळात चांगलाप्रकारे परतावा देण्यच्या आमिषाने आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी यापूर्वी जोशी यांच्यासह मुलाविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झालेला आहे. मयुरेश जोशी याने सदाशिव पेठेतील निनाद नागरी पतसंस्थेतून कर्ज घेतले होते.

मात्र, तक्रारदार तानाजी मोरे यांना या कर्जप्रकरणाची कोणतीही सविस्तर माहिती न देता कर्जप्रकरणावर त्यांची बनावट स्वाक्षरी आरोपींनी केली. पतसंस्थेतील पदाधिकारी उदय जोशी, रामलिंग शिवगणे, अशोक कुलकर्णी, तसेच संचालक मंडळातील अन्य संचालकाशी संगनमत करून ७७ लाख रुपयांचे कर्ज परस्पर मंजूर करून घेतले. या कर्जप्रकरणाची कोणतीही माहिती मोरे यांना न देता आर्थिक फसवणूक केली, तसेत कर्जाची परतफेड देखील आरोपींनी केली नाही. याबाबत पुढील तपास विश्राम बाग पोलीस करत आहे.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments