Saturday, February 15, 2025
Homeक्राईम न्यूजविमाननगरमध्ये वाहतुकीत तात्पुरते बदल करण्याचे आदेश

विमाननगरमध्ये वाहतुकीत तात्पुरते बदल करण्याचे आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता पुणे शहरातील विमाननगर वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत तात्पुरते बदल करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. फिनिक्स मॉल (विमाननगर चौक, जंक्शन) ते सोमनाथ नगर चौक दरम्यान गोलाकार पद्धतीने वाहतुकीत बदल करण्याकरीता विमाननगर चौक, जंक्शन जंक्शन हे प्रायोगिक तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहे.

विमाननगर येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी विमाननगर चौकातून डावीकडे वळन घेऊन सोमनाथ नगर चौक येथून यू टर्न घेवून इच्छितस्थळी जावे. नगरकडून पुण्याकडे येणाऱ्या व विमाननगर फिनिक्स मॉलकडे जाणाऱ्या वाहनांनी अग्निबाज गेट समोरुन यू टर्न घेऊन इच्छितस्थळी जावे. या आदेशाबाबत नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस जवळ, बंगला क्रमांक ६, विमानतळ मार्ग, पुणे यांच्या कार्यालयात १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे पोलीस उपआयुक्त अमोल झेंडे यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments