Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजविमानतळ पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखलः पती-पत्नीचे भांडणे सोडवायला गेलेल्या महिलेसह...

विमानतळ पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखलः पती-पत्नीचे भांडणे सोडवायला गेलेल्या महिलेसह पती व नातवाला मारहाण

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पती-पत्नीचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेसह तिच्या पती आणि नातवाला लाकडी बॅटने मारहाण करून जखमी केल्याची घटना विमानतळ परिसरात घडली आहे. याप्रकरणी मुलगा आणि आईवर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी राहुल किसन भारस्कर (वय-३५), हिराबाई किसन भारस्कर (वय-५५, रा. दोघेही दुर्गामाता मंदिराजवळ, खुळेवाडी) यांच्यावर विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत साखराबाई बबन शिरसाठ (वय-६०, रा. खुळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी साखराबाई शिरसाठ आणि भारस्कर कुटुंबीय शेजारी राहायला आहेत. आरोपी राहुल भारस्कर हे पत्नी सोबत भांडण करून तिला मारहाण करत होते. यावेळी फिर्यादी यांनी राहुलला पत्नीला शिविगाळ का करतो असे विचारले. याच राग आल्याने राहुल भारस्कर याने फिर्यादी यांना शिवीगाळ करून त्यांच्या पतीला हाताने मारहाण केली.

फिर्यादी या मध्ये पडल्या असता राहुलने बॅटने मारहाण करून जखमी केले. तसेच आरोपी हिराबाई भारस्कर यांनी सुद्धा फिर्यादी यांना मारहाण केली. भांडणे सोडवायला आलेल्या फिर्यादी यांचा नातू सनी शिरसाठ याला आरोपी राहुल भारस्कर याने लाकडी बॅटने मारहाण करून जखमी केले. तसेच माझ्या विरुद्ध तक्रार दिली तर तुम्हाला येथे राहू देणार नाही असे म्हणत सुटून आल्यावर तुमचे हात पाय तोडून टाकतो अशी धमकी दिल्याचे फिर्यादेत नमूद केले करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार एस कदम करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments