इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
सासवड : पुरंदर तालुक्यातील वीर येथील गायरानातील परिसरातलोकांनी घरे बांधली आहेत. ही अतिक्रमणे हटवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. ही अतिक्रमण काढल्यामुळे येथील नागरिक बेघर होतील, असा प्रश्न अॅडव्होकेट बिपिन शिंदे यांनी उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना हा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित असून, सर्वसामान्य गोरगरिबांची घरे कोणीही काढू शकत नाही. विधानसभेत पोहोचल्यानंतर निवासी घरे नावावर करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे, असे पुरंदर हवेलीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संभाजीराव झेंडे यांनी यावेळी सांगितले.
वीर (ता. पुरंदर) येथे जनसंवाद यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कोपरा सभेमध्ये संभाजीराव झेंडे बोलत होते. गायरानातील हा घराचा प्रश्न राज्यस्तरीय आहे, त्यामुळे विधिमंडळात ठराव करून तो सोडवावा लागेल. यासाठी मी प्रयत्न करेल, असे संभाजीराव झेंडे यांनी सांगितले. सर्व समावेशक चेहरा म्हणून संभाजीराव झेंडे हे उमेदवार दिले आहेत. उभ्या असलेल्या तीनही उमेदवारांची चेहरे पाहिले असता स्वच्छ चेहरा म्हणून संभाजीराव झेंडे यांचेच नाव पुढे येते. तेव्हा त्यांच्या घड्याळाच्या चिन्हा पुढील बटन दाबून संभाजीराव झेंडे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, असे आव्हान निरा मार्केट कमिटीचे सभापती शरद जगताप यांनी केले.
सामाजिक विषयाची जाण असलेले तसेच सदाशिव अण्णा झेंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या उमेदवारांनी तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यात चारा वाटप केला. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले, असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराज काकडे, दत्ता झुरंगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष उत्तम धुमाळ, ऋतुजा धुमाळ, सागर धुमाळ, आकाश धुमाळ, बिपिन शिंदे, राहुल कापरे, राहुल गायकवाड, वैभव वचकल, महेश धुमाळ, रामा धुमाळ, विकास हेंद्रे, मनोज कुंभार तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते वीर आणि पंचक्रोशीतील नागरिक यावेळी उपस्थित होते.
अजित पवार यांची सभा रविवारी (दि. 17) सासवड येथे पालखी तळावर असणार आहे. सर्वसमावेशक चेहरा म्हणून संभाजीराव झेंडे हे उमेदवार दिले आहेत. उभ्या असलेल्या तीनही उमेदवारांचे चेहरे पाहिले असता स्वच्छ चेहरा म्हणून उमेदवार संभाजीराव झेंडे यांचेच नाव पुढे येते. रविवारी सासवड येथे पालखी तळावर सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उमेदवार संभाजीराव झेंडे यांनी प्रतिनिधीला दिली.