इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
केडगाव : गेल्या महिन्याभरापासून दौंड तालुक्यातील राजकीयवातावरणाने चांगलाच वेग पकडला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरनी सोशल मीडियाबरोबर सभामध्ये सुरु आहेत, पण खरी रंगीत तालीम रंगली ती भीमा पाटस कारखान्याची. सर्व साधारण सभेमध्ये दौंड तालुक्यातील सर्वच राजकीय पुढा-यांनी हजेरी लावली होती. त्यात दौंडचे आमदार राहुल कुल यांना खिंडीत पकडण्याची संधी विरोधकांना चालून आली होती. कारण येत्या काही दिवसात विधासभा निवडणूक होणार असून विरोधकांसाठी भीमा पाटस कारखाना हाच महत्वाचा मुद्दा होता. पण कालच्या सभेत आमदार राहुल कुल यांच्या शांत आणि अभ्यासपूर्ण उत्तराने विरोधकांची बोलती बंद केल्याची चित्र सभे दरम्यान पाहायला मिळाले.
कारण गेली तीन ते चार दिवसापासून तालुकाभर चर्चा होती की, भीमा पाटस कारखान्याची 42 वी सभा वादळी होणार, विद्यमान आमदार राहुल कुल हे निरुत्तर होणार, त्यांना कारखान्याच्या अनेक किचकट प्रश्नावरून घेरले जातील, कामगारांचा प्रश्न, त्यांच्या पेन्शनचा प्रश्न, कारखाना निरानी ग्रुप चा की सभासदांचा तसेच कारखान्याच्या तळेबंदावरून राहुल कुल हे अडचणीत येतील अशी चर्चा तालुका भर रंगली होती. त्यात काही दिवसांवर आलेली विधानसभा निवडणुकीमध्ये याचा फटका आमदार राहुल कुल यांना होणार असा नरेटिव सेट करण्यात विरोधकांना यश आले होते. तसेच कारखान्याच्या मुद्यावरून सर्व पक्षाचे विरोधक प्रथमच एकत्र झाले होते त्यामुळे सभा जोरदार वादळी होणार म्हणून विक्रमी सभासदांची गर्दी जमा झाली होती.
प्रथमता भीमा पाटस कारखाना सहकारी आहे की खाजगी झाला आहे. याबाबत संचालक मंडळ आणि प्रामुख्याने कारखान्याचे चेअरमन राहुल कुल यांच्यावर विरोधकांकडून अनेक हे आरोप केले जायचे मात्र सर्व राजकीय विरोधक, कारखान्याचे सभासद आणि शेतकऱ्यांना आमदार राहुल कुल यांनी अत्यंत नम्र स्वभाव आणि शांतपणे उत्तरं दिल्याने विरोधकही चक्रावून गेले. तसेच यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार रमेश थोरात, नामदेव ताकवणे, राजाराम तांबे, वैशाली नागवडे या मुख्य फळीतील नेत्यांनी अनेक प्रश्न विचारून चेअरमन आमदार राहुल कुल यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्येक प्रश्नांची मुद्देसूद आणि शांततेमध्ये कुल यांनी उत्तरे दिल्याने अनेकजण निरुत्तर झाले असल्याचे पाहायला मिळाले.
तसेच तालुक्यातील नागरिकांना खरी परिस्थिती म्हणजे कारखाना हा सभासदांचाच आहे हे सिध्द करण्यात चेअरमन, तथा आमदार राहुल कुल हे यशस्वी झाले, तसेच कारखान्याच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाचा प्रश्न येत्या 15 दिवसांत मार्गी लावला जाईल, असे चेअरमन राहुल कुल यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. आणि तिथेच विरोधकांची हवा काढण्यात आमदार राहुल कुल हे यशस्वी झाले असल्याची चर्चा तालुका भर रंगली आहे.
तसेच आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीची रंगीत तालीम जिंकण्यात आमदार राहुल कुल हे यशस्वी झाले आहेत, असे अनेक सभासदांनी बोलून दाखवले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील विरोधकांना आमदार राहुल कुल हे जड जातील हे चित्र या सभेवरून निर्माण झाले आहे.