Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजविद्येच्या माहेरघरात हुक्का पार्लर, पब संस्कृती बंद व्हावीः पुण्याची ओळख उडता...

विद्येच्या माहेरघरात हुक्का पार्लर, पब संस्कृती बंद व्हावीः पुण्याची ओळख उडता पंजाब सारखी होत आहे – आमदार रवींद्र धंगेकर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणात तत्कालीन ससून रुग्णालयाचे डीन डॉ. सजीव ठाकूर यांना सरकारने पाठीशी घातले आहे. त्यांच्यावर पोलिसांनी अहवाल देऊन देखील कारवाई केली गेली नाही. पंजाब नंतर पुणे हे उडता पंजाब झाले आहे. अनेक ललित पाटील कार्यरत आहे. हुक्का पार्लर, पब मध्ये मोठ्या प्रमाणत ड्रग्ज मिळत आहे.

विद्येच्या माहेरघरात पब संस्कृती बंद झाली पाहिजे. यामाध्यमातून आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असून भ्रष्टाचार पाळेमुळे यात असल्याने लाखो रुपयांचे हफ्ते पोलिसांना यामध्ये मिळतात. पुणे जिल्ह्यात ड्रग्ज कारखाना अनेक महिने सुरू असताना प्रशासकीय व्यवस्था करत होती मुले व्यसनाधीन झाली नाही पाहिजे याकरीता पोलिसांनी वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे असे मत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

धंगेकर म्हणाले, चार हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज्ज गेल्या 3 दिवसात पुण्यात सापडले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पुण्यात सापडत असेल तर ते गृह मंत्रालयाचे, सुरक्षा यंत्रणाचे अपयश आहे. अमली पदार्थाचे साठे महाराष्ट्रात आणि तेही पुण्यात तयार झालेच कसे? ते वेळीच रोखले का गेले नाहीत? याची माहिती आधीच सुरक्षा यंत्रणाना का मिळाली नाही…. हे मला सरकारला विचारायचे आहे. आता सरकारची नेमकी भूमिका काय आहे, हा फोफावत चाललेला धंदा उखडून टाकण्यासाठी कोणता अॅक्शन प्लॅन सरकारने, गृह खात्याने हाती घेतला आहे? हे सरकारने पुढे येऊन सांगितले पाहिजे. पुण्यात विशेषतः ग्रामीण भागात जावून हे माफिया इतर उद्योग धंद्याच्याआड हे रॅकेट चालवत आहेत. हे अतिशय चिंताजनक आहे. पुण्यात तयार झालेले अमली पदार्थ राज्याच्या वेगवेगळ्या भागात पोहचवले जात आहे.

राज्याबाहेरही पाठवले जात आहे. त्यामुळे या रॅकेटची सखोल चौकशी झाली पाहिजे. अमली पदार्थ तयार करणाऱ्या लोकांना पोलिसांनी पकडले आहे. पण रॅकेट चालवणारे ललित पाटील सारख्या दोषी लोकांनाही पोलिसांनी जेरबंद करायला हवे. पुण्यात ललित पाटील ड्रग्ज्ज प्रकरण घडल्यानंतर मी पोलिसांना पुण्यात अनेक ‘ललित पाटील’ आहेत, असे सांगितले होते. तरुणाई नशेच्या आहारी जात आहे. पुण्याची ओळख उडता पंजाब सारखी होत आहे. अमली पदार्थांचे रॅकेट चालवणाऱ्या प्रत्येक ‘ललित पाटील’चा शोध घेवून त्यांना जेरबंद करा, असेही मी दोन महिन्यापूर्वीच सांगितले होते. ललित पाटील ड्रग्ज्ज प्रकरण मी सतत लावून धरले आहे. त्यामुळे तपास काही अंशी झाला. अन्यथा राजकीय दबावामुळे त्या प्रकरणाचा तपास थोडा सुद्धा झाला नसता. आताही राजकीय दबावामुळेच तत्कालीन अधिष्ठाता डॉ ठाकूर याला पोलिसांनी अटक केली नाही. सरकारने अटकेची परवानगी अद्याप दिली नाही, असे मला पोलिसांकडून समजले. सरकारचे हे कृत्य संशयास्पद आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments