Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजविद्यार्थ्यांचे लॅपटॉप चोरणाऱ्या तरुणाला अटक

विद्यार्थ्यांचे लॅपटॉप चोरणाऱ्या तरुणाला अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : वारजे माळवाडी आणि सिंहगड रस्ता भागातील वसतिगृहामधून विद्यार्थ्यांचे लॅपटॉप चोरी करणाऱ्या तरुणाला वारजे पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून नऊ लॅपटॉप, मोबाईल आणि दुचाकी जप्त केली आहे.

तेजस दत्तात्रेय सूर्यवंशी (वय २३, रा. मगनपुरा, नवा मोंढा, जि. नांदेड) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस एक वर्षापासून पुण्यात ‘डीएमएलटी’ अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. शिवाय, तो घरपोच खाद्यपदार्थ पुरवठा करणाऱ्या एका कंपनीत काम करीत होता.

वसतिगृहातील मुले बाहेर गेल्यानंतर तो लॅपटॉप चोरी करीत होता. वारजे पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चार लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज शेडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments