Wednesday, November 29, 2023
Home क्राईम न्यूज विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मडगाव : गोव्यातील दक्षिण गोव्यात एका पीटी शिक्षकानेच एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. या प्रकरणात पीटी शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रमेश सोनू गांवकर असे संशयिताचे नाव आहे.

गोव्यतील कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका सरकारी हायस्कुलमध्ये शिक्षक कामाला होता. शिक्षकदिन जवळ येऊन पोहचला असतानाच, शिक्षकी पेशाला काळीमा लावणारी ही घटना घडल्याने याबाबत अधिकच हळहळ व्यक्त होत आहे. संशयिताविरोधात कुंकळ्ळी पोलिसांनी भादंसंच्या ३५४ (अ) व ५०९, गोवा बाल कायदा कलम ८, बाल सरंक्षण कायदा व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६३, ६७ (अ) अंतर्गंत गुन्हा नोंद केला आहे. बुधवारी रात्री त्याला पोलिसांनी अटक केली.

पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण पुढील तपास करीत आहेत. विनयभंगाची वरील घटना काही दिवसांपुर्वी घडली होती. रमेश हा पीटी शिक्षक आहे. एका विदयार्थीनीचा त्याने हात पकडला होता. तसेच ती दोरीउडीचा सराव करताना तो तिला नेहमी न्याहाळात होता. तिला आपल्या मोबाईलवरुन त्याने पोर्नोग्राफी व्हिडीओही पाठविले होते. त्या मुलीने पालकांना ही बाब सांगितल्यानंतर हा किळसवाणा प्रकार उघडकीस आला होता. बुधवारी या संबधी कुंकळ्ळी पोलिसांत त्या हायस्कुलच्या मुख्याध्यीपिकेने तक्रार नोंदविली. पोलिसांनी लागलीच या प्रकरणाचा तपास करुन संशयिताला गजाआड केले.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments