Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजविद्यार्थिनीचा खून करून जाळून पुरले, नंतर कुटुंबास मागितली 9 लाख खंडणी: मृत...

विद्यार्थिनीचा खून करून जाळून पुरले, नंतर कुटुंबास मागितली 9 लाख खंडणी: मृत तरुणीसह एक आरोपी लातूरचा, तर दोन आरोपी नांदेडचे, तिघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

विमानतळ परिसरातील मॉलच्या आवारातून अपहरण झालेल्या अभियांत्रिकीच्या तरुणीचा खून झाल्याचे उघड झाले आहे. अारोपींना अॉनलाइन रमी, शेअर्स ट्रेडिंगमध्ये कर्जबाजारीपणा अाल्याने त्यांनी परिचित तरुणीचे अपहरण करून खून केल्याचे चौकशीत उघडकीस अाले अाहे.

धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित तरुणीचा खून करण्यासाठी अारोपींनी सीअायडी मालिका वारंवार पाहून त्यानुसार दीड महिन्यापूर्वीच खुनाचा व खंडणीचा कट रचला. तरुणीचा खून करण्यापूर्वी एक दिवस अाधी पुण्यापासून १०० किलोमीटर अंतरावर अहमदनगर जिल्ह्यातील सुपा परिसरात कामरगावाच्या हद्दीत एक खड्डादेखील अारोपींनी करून ठेवला. त्यासाठी त्यांनी अॅपवरून कार भाड्याने घेतली होती. दोन्ही वेळेस कार कामरगाव गावाच्या हद्दीत थांबल्याचे कारच्या जीपीएस विश्लेषणातून नंतर पोलिसांना दिसले. तरुणीचे अपहरण केल्यावर अारोपींनी गाडीतच तिचा दीड ते दोन तासात खून केला. त्यानंतर जातानाच वाटेत एका पेट्रोल पंपावर बाटलीत पेट्रोल भरून घेतले व संबंधित जागेवर गेल्यानंतर खड्ड्यात तिचा मृतदेह टाकून त्यावर पेट्रोल अवेतून तिचा चेहरा विद्रूप करण्यासाठी पेटवून देण्यात अाला. नंतर मृतदेह पुरून अारोपी पसार झाले होते. भाग्यश्री सूर्यकांत सुडे (२२, सध्या रा. विमाननगर, मूळ रहिवासी लातूर) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्या हत्येप्रकरणी शिवम फुलवळे (२१, मूळ रहिवासी नांदेड), सुरेश शिवाजी इंदोरे (२३ रा. मुखेड, जि. नांदेड) आणि सागर रमेश जाधव (२३, रा. ता. शिरोळा, जि. लातूर) यांना अटक करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments