Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजविद्यापीठातर्फे सावित्रीबाई फुले सन्मान प्रदान

विद्यापीठातर्फे सावित्रीबाई फुले सन्मान प्रदान

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे, ता. १५: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ विभागामार्फत सावित्रीबाई फुले सन्मान प्रदान करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ भारुड सम्राज्ञी पद्मजा कुलकर्णी, योग अभ्यासिका प्रज्ञा पाटील, सामाजिक कार्यकर्त्या सकीना बेदी, मनीषा तोकले, वैशाली गांधी यांचा सन्मान करण्यात आला. प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, कुलसचिव प्रा. डॉ. विजय खरे, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, बागेश्री मंठाळकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक प्रा. डॉ. अभिजित कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा. डॉ. सदानंद भोसले आदी उपस्थित होते. प्रा. डॉ. सविता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments