Tuesday, January 14, 2025
Homeक्राईम न्यूजविचित्र अपघात...! ट्रकच्या धडकेत डॉक्टर महिलेचा मृत्यू; डोक्यावरून चाक गेल्याने पाहणाऱ्यांच्या अंगाचा...

विचित्र अपघात…! ट्रकच्या धडकेत डॉक्टर महिलेचा मृत्यू; डोक्यावरून चाक गेल्याने पाहणाऱ्यांच्या अंगाचा उडाला थरकाप

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकी महिला जागीच ठार झाल्याची धक्क्कादायक घटना घडली आहे. ही घटना बुधवारी ८ जानेवारी रोजी उंड्रीतील कानडे नगर येथे साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉ. प्रणाली तन्मय दाते (वय-३४ वर्ष, रा. अर्बन नेस्ट सोसायटी, उंड्री) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, प्रणाली दाते या साडे बारा वाजण्याच्या सुमारास उंड्रीकडून हांडेवाडीच्या दिशेने जात होत्या, यावेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्या रस्त्यावर पडल्या असता त्यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हा अपघात एवढा भीषण होता कि, डोक्यातून बाहेर आलेला मेंदू रस्त्यावर छिन्नविछिन्न झाला होता. ट्रक चालक पांडुरंग बलभीम भोसले (वय-३५ वर्ष, मूळ गाव तुळजापूर, धाराशिव) याने घटनास्थळावरून पळ काढला. फरार झालेल्या आरोपीला ‘सीसीटीव्ही’च्या मदतीने शोधून अटक करण्यात आली आहे, असे काळेपडळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments