इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पिंपरी चिंचवडः शहरातील दापोडी परिसरात हवेत कोयते फिरवून दहशत निर्माण करणे महागात पडले आहे. आरोपींनी कोयते फिरवत रिक्षांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. तोडफोड प्रकरणी फिरोज इर्षात शेख यांनी दापोडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर दापोडी पोलिसांनी कोयते फिरवणाऱ्या गुंडांची भर वस्तीमधून धिंड काढली आहे. मुजफ्फर कुरेशी, नुमान खान आणि सिपटेन खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अधिक माहिती अशी की, ही घटना १५ फेब्रुवारीला घडली होती. दापोडीतील मदरसा परिसर आणि पवार वस्ती भागात रस्त्यावर लावलेल्या दोन रिक्षांची गुंडांनी तोडफोड केली होती. १५ फेब्रुवारी रोजी तिन्ही आरोपींनी पाच ते सहा दुचाकींची कोयते फिरवत तोडफोड केली होती. त्यात दुचाकींचा मोठं नुकसान झालं होतं. तसेच हवेत कोयते फिरवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.
याप्रकरणी उपद्रविंविरोधात दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर मुजफ्फर कुरेशी, नुमान खान आणि सिपटेन खान यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींना धडा शिकवण्यासाठी घटनास्थळ पवार वस्ती आणि तोडफोड केलेल्या भागातून धिंड काढली आहे.