Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजवाहनचोरी करणाऱ्याचे गुन्हे पोलिसांकडून उघड: चोरीची 12 वाहने जप्त; कोथरुड पोलिसांची...

वाहनचोरी करणाऱ्याचे गुन्हे पोलिसांकडून उघड: चोरीची 12 वाहने जप्त; कोथरुड पोलिसांची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वाढत्या वाहनचोरीच्या गुन्हयांना पायबंद घालण्यासाठी कोथरुड पोलिसांनी पेट्रोलिंग करत, सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून व गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती काढून संशयित वाहनचोरास अटक करण्यात आली आहे.

निलेश रमेश कंधारे (वय- ३३, रा. एमआयटी रस्ता, कोथरुड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून चोरीची सहा लाख रुपये किंमतीची १२ दुचाकी वाहने जप्त करण्यात आलेली आहे.

पोलीस अायुक्त अमितेश कुमार यांनी वाहनचोरीस प्रतिबंध करण्यासाठी व वाहनचोरीचे गुन्हे तात्काळ उघडकीस अाणण्याकरिता पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या होत्या. या सूचनांचे अनुषंगाने परिमंडळ तीन मधील कोथरुड विभागाचे पोलीस त्यांचे हतीत वाहनचोरीस प्रतिबंध करण्याचे दृष्टीने उपाययोजना करत होत्या. वाहनचोरीस प्रतीबंध करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे अनुषंगाने कोथरुड पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळ्या प्रकारे पेट्रोलींग नेमण्यात अाले होते. त्यात ट्रॅप लावणे, सीसीटीव्ही फुटेज तपासणी करणे, गोपनीय बातमीदार मार्फत माहिती प्राप्त करणे वगैरे प्रकारे वाहनचोरीस प्रतिबंध करण्याची व गुन्हे उघडकीस अणण्याची कार्यवाही चालू होती.

या मोहीमे दरम्यान ज्या ठिकाणी वाहनचोरीचे गुन्हे घडलेले अाहे, त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करताना निलेश कंधारे हा संशयित अारोपीन दिसून अाला. त्याचा शोध घेऊन पोलीसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील चौकशीत तय्ाने कोथरुड, डेक्कन, पौड पोलीस ठाण्याचे हद्दीतून चोरलेली सहा लाख रुपये किंमतीची १२ वाहने जप्त करण्यात अाल्याची माहिती पोलीस उपायुक्त संभाजी पाटील व वपोनि संदीप देशमाने यांनी दिली अाहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments