Friday, November 22, 2024
Homeक्राईम न्यूजवाहनचालकाकडून पोलीस शिपायाला धक्काबुक्की, कल्याणीनगर येथील घटना

वाहनचालकाकडून पोलीस शिपायाला धक्काबुक्की, कल्याणीनगर येथील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यात नाकाबंदीदरम्यान वाहतूक शाखेच्या पोलीस शिपायलामद्यपी वाहनचालकाने धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मद्यपी वाहनचालकाविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखलकेला आहे. ही घटना कल्याणीनगर परिसरातील बिशप स्कूल परिसरातशुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. चिराग राजेंद्र मुंदडा(वय २९, रा. नारायण पेठ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यावाहनचालकाचे नाव आहे. याबाबत येरवडा वाहतूक शाखेतील पोलीसशिपाई संदीप खंडागळे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीआहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात दररोज रात्री नाकाबंदी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. भरधाव वेग, तसेच दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, येरवडा वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई संदीप खंडागळे आणि सहकाऱ्यांनी येरवड्यातील कल्याणीनगर भागात नाकाबंदी केली होती.

त्यावेळी कल्याणीनगर परिसरातील बिशप स्कूल परिसरात शुक्रवारी मध्यरात्री नाकाबंदी करुन वाहनचालकांची तपासणी करण्यात येत होती. त्यावेळी वाहनचालक चिराग मुंदडा याची तपासणी करण्यात आली. मुंदडा याने तपासणीस विरोध करत खंडागळे यांच्या हातातील मोबाइल संच हिसकावून त्यांना धक्काबुक्की केली. तपासणी केली असता मुंदडाने दारु पिऊन वाहन चालविल्याचे उघडकीस आले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लामखेडे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments