Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजवाल्मीक कराडच्या एन्काऊंटरसाठी धनंजय मुंडेंकडून कोट्यवधीची ऑफर; निलंबित पोलीस अधिकाऱ्यांच्या दाव्याने खळबळ

वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरसाठी धनंजय मुंडेंकडून कोट्यवधीची ऑफर; निलंबित पोलीस अधिकाऱ्यांच्या दाव्याने खळबळ

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बीड : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. अशातच आता बीडचे सायबर विभागातील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यांनी या व्हिडीओत संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा केला आहे. मला वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची कोट्यवधीची ऑफर होती असा दावा त्यांनी केला आहे.

रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी अनेक दावे त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून केले आहेत. त्यानंतर आता वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरबद्दल केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. वाल्मीक कराडचा एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केला होता. मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा धनंजय मुंडे यांना पाठिंबा असल्याने संतोष देशमुख प्रकरणात अनेक पुरावे दाबले गेलेत. त्यामुळे ते सहआरोपी होणार नाहीत असा दावाही रणजीत कासले यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

दरम्यान रणजीत कासले यांनी व्हिडीओमध्ये असे म्हटले की, ज्यावेळी मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर दिली होती त्यावेळी मी नकार दिला. एन्काऊंटरसाठी मोठी रक्कम ऑफर दिली जाते, १०, २०, ५० कोटी इतके दिले जातात. तुम्ही बोलाल तेवढे पैसे देतो असं त्यांनी म्हटलं. मी सायबर शाखेत होतो, पण मी हे करू शकतो हे माहिती असल्याने त्यांनी मला ऑफर दिली होती. वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरसाठी 50 कोटींची ऑफर दिल्याचं ते म्हणाले. त्यांच्या या दाव्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments