इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुरंदर : ग्रामविकास मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग व सासवड पालखी तळाची पाहणी केली. यावेळी यावर्षीच्या वारीत महिलांसाठी असुविधा होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर स्नानगृहे व शौचालयांची व्यवस्था केली जाणार असल्याचे मंत्री गोरे यांनी म्हटले.
मंत्री गोरे यांनी पालखी मुक्काम आणि विसाव्याच्या ठिकाणांची पाहणी केली. तसेच, पावसामुळे वारकऱ्यांना निवारा पुरवण्यासाठी ठिकठिकाणी एकाच वेळी ५ हजार वारकऱ्यांना उभे राहता येतील असे वॉटरप्रूफ मंडप प्रथमच उभारले जाणार आहेत. यामध्ये मेडिकलची सोय असेल. सासवड येथील पालखीतळ यापूर्वीच चांगले विकसित करण्यात आल्यामुळे येथे काही अडचण येणार नाही, असा विश्वासही मंत्री गोरे यांनी व्यक्त केला.