इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः शहरातील वानवडी परिसरात कौटुंबिक वादातून तरुणाला बेदम मारहाण करुन त्याचा खुन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आता याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी की, या प्रकरणात घोरपडी येथील महेंद्र अनिल कवडे (वय ३६, रा. गंगा क्वीन सोसायटी) हे गंभीर जखमी झाले आहेत. आता याप्रकरणी चौघांविरुद्ध खुन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. झालेल्या हल्याबबत महेंद्र कवडे यांनी मुंढवा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र कवडे आणि आरोपी यांचे नतेसंबंध आहेत. कौटुंबिक कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. १३ फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वानवडी परिसरातील शितळादेवी मंदिर चौकात पीडित महेश कवडे यांना आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी अडवून कवडे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, या मारहाणीत त्यांच्या डोक्यात कठोर वस्तूने हल्ला केला. त्यामुळे या मारहाणीत कवडे गंभीर जखमी झाले होते.
त्यानंतर कवडे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी कवडे यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली असता त्यानंतर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भीमराव मांजरे करत आहेत.