Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजवानवडीत लष्कराच्या मोकळ्या जागेत आढळला तरुणाचा मृतदेह; शरीरावर धारदार शस्त्राने वार,...

वानवडीत लष्कराच्या मोकळ्या जागेत आढळला तरुणाचा मृतदेह; शरीरावर धारदार शस्त्राने वार, परिसरात खळबळ

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील वानवडी येथील लुल्लानगर भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लष्कराच्या मोकळ्या जागेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खून झालेल्या तरुणाची ओळख पटलेली नसून पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी येथील लुल्लानगर परिसरात लष्कराची विक्रम बात्रा वसाहत आहे. या वसाहतीच्या परिसरात केंद्रीय विद्यालय आहे. या भागात लष्कराची मोकळी जागा आहे. या जागेत ३० ते ३५ वर्षांचा तरुण मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे वानवडी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र करणकोट यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

त्यानंतर तरुणाच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे आढळून आले. तरुणाची ओळख पटलेली नसल्याने पोलिसांकडून अधिकचा तपास करण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अंमलदार संदीप वाघ यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments