Tuesday, January 14, 2025
Homeक्राईम न्यूजवाढदिवसाच्या दिवशी अग्निशामक दलाकडून बालकाला जीवदान; पाच महिलांचीही आगीतून सुटका केल्याने मोठा...

वाढदिवसाच्या दिवशी अग्निशामक दलाकडून बालकाला जीवदान; पाच महिलांचीही आगीतून सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : कोंढवा परिसरात मंगळवारी (दि. १७) दुपारी बालकाच्या तिसऱ्या वाढदिवसाची तयारी करत असताना अचानक इमारतीला आग लागल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी जाऊन या बालकाची सुखरूप सुटका केली. त्याच्याबरोबरच पाच महिलांचीही आगीतून सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला.

स्थानिक रहिवाशांनी या घटनेची माहिती अग्निशामक दलाला दिली. त्यानुसार या दलाचे पथक तातडीने घटनास्थळी पोचले. या दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखून पाण्याचा मारा सुरू करत आग न पसरण्याची काळजी घेतली. जवानांनी श्वसन यंत्र परिधान करून घरात अडकलेल्या तीन वर्षांच्या बालकासह पाच महिलांची सुटका केली. या आगीत कपडे, लाकडी साहित्य, विद्युत उपकरणे, यंत्रसामग्री जळाली. आगीमागचे नेमके कारण समजू शकले नाही. आगीत एका महिलेसह अग्निशमन दलाच्या जवानाच्या पायाला किरकोळ दुखापत झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments