Thursday, November 30, 2023
Home कोच्ची वाढदिवशी GPS ने चुकीची दिशा दाखवली, 2 डॉक्टर्सच आयुष्य संपलं, रस्ता समजून...

वाढदिवशी GPS ने चुकीची दिशा दाखवली, 2 डॉक्टर्सच आयुष्य संपलं, रस्ता समजून ते…….

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

कोच्ची: लांबच्या प्रवासाला निघाल्यानंतर बरेचजण GPS वर •अवलंबून असतात. GPS योग्य रस्ता दाखवेल असा विश्वास असतो. खासकरुन रात्रीच्या प्रवासात GPS ची मोठी मदत होते. भारतात GPS चा वापर करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. GPS वर डोळेझाकून विश्वास ठेवला जातो. पण आता GPS कडून झालेल्या चुकीच्या दिशा मार्गदर्शनामुळे दोन डॉक्टर्सना आपले प्राण गमवावे लागले आहेत. केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यात ही दुर्देवी घटना घडलीय. डॉ. अद्वैत (29) आणि डॉ. अजमल असीफ (29) आणि अन्य तिघे होंडा सिव्हीकमधून प्रवास करत होते. मध्यरात्र झाली होती. रात्रीचे 12.30 वाजले होते. सर्व काळोख होता. धुवाधार पाऊस कोसळत होता. रस्ता परिचयाचा नव्हता. होंडा सिव्हीक कारमध्ये दोन डॉक्टर्स आणि अन्य तिघे होते.

रात्रीचा कोळख आणि समोरचा रस्ता स्पष्ट दिसत नव्हता. म्हणून डॉ. अद्वैत यांनी GPS ऑन केले. ते गाडी चालवत होते. पाण्याने भरलेल्या रस्त्यावरुन त्यांची गाडी मार्ग काढत होती. GPS मॅप समोर रस्ता असल्याच दाखवलं. कार तशीच पुढे जात राहिली. अखेर कार पाण्याच बुडू लागली. कारण रस्ता समजून कार पुढे जात होती, तो रस्ता नव्हता, नदी होती. डॉ. अद्वैत आणि डॉ. अजमल असीफ यांचा बुडून मृत्यू झाला अन्य तिघे कारमधून बाहेर पडण्यात यशस्वी ठरले. ते बचावले. केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यात गोथुरुथमध्ये रविवारी मध्यरात्री 12.30 च्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.

GPS वापराबद्दल एक्सपर्ट्स काय म्हणाले?

शनिवारी डॉ. अद्वैत यांचा वाढदिवस होता. ते आणि अन्य चार जण कोडुंगल्लूर येथून कोच्चीला परतत होते. बर्थ डेच्या शॉपिंगसाठी म्हणून ते तिथे गेले होते. GPS कडून मार्ग दाखवला जात असताना हा अपघात घडला. “आम्ही GPS स्टार्ट केलं होतं. मी कार चालवत नव्हतो. ही मानवी चूक होती की एप्लिकेशनमधील टेक्निकल प्रॉब्लेम हे मी स्पष्टपणे सांगू शकत नाही” असं बचावलेल्या एका डॉक्टरने सांगितल. डॉ. अद्वैतचा बर्थ डे होता. म्हणून सेलिब्रेशनसाठी ते सर्व कोच्चीला गेले होते. यात हॉस्पिटलमधील एक पुरुष नर्सही होता. डॉ. अशोक रवी यांनी ही माहिती दिली. मान्सूनच्या काळात जीपीएस अल्गोरिदम फार ट्रॅफिक नसलेला मार्ग सुचवतात पण तो रस्ता सुरक्षित असेलच असं नाही. दुचाकी ज्या मार्गावरुन जाते, तो मार्ग चारचाकीसाठी सुरक्षित असेलच असं नाही, असं एक्सपर्टने सांगितलं.

RELATED ARTICLES

ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचा बँक बॅलेन्स प्रॉपर्टी बाबतचा तपास करणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालविणारा अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या भूषण पाटील,...

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचा बँक बॅलेन्स प्रॉपर्टी बाबतचा तपास करणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालविणारा अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या भूषण पाटील,...

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

Recent Comments