Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजवाडेबोल्हाई येथे हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणारे पाच आरोपी जेरबंद; लोणीकंद...

वाडेबोल्हाई येथे हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणारे पाच आरोपी जेरबंद; लोणीकंद पोलिसांची कामगिरी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः अजित महादेव जाधव, (वय 26 वर्ष धंदा शेती रा बकोरी ता. हवेली जि. पुणे) व गणेश संजय चौधरी (वय 29 वर्ष रा.मु. पो वाडेगाव भोर वस्ती ता हवेली जि पुणे) यांच्यात वैयक्तिक वादाच्या कारणावरून वाडेबोल्हाई येथे झालेल्या भांडणाच्या वेळी हवेत गोळीबार झाल्याची घटना 12 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. त्यानंतर 13 मार्च रोजी गणेश संजय चौधरी व त्याचे इतर साथीदार मित्र यांच्याविरुद्ध लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सर्जेराव कुंभार यांनी तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र गोडसे यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक गोडसे व पोलीस अंमलदार अजित फरांदे, कैलास साळुंखे, स्वप्नील जाधव, सागर जगताप, अमोल ढोणे, शुभम चिनके, मल्हारी सपुरे, सुधीर शिवले यांच्या दोन टीम तयार केल्या.

त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र गोडसे व वरील पोलीस अंमलदार यांनी गुन्ह्यातील आरोपींचा उरुळी कांचन, यवत, दौंड परिसरात शोध घेऊन आरोपी गणेश संजय चौधरी (वय 29 वर्ष रा.मु.पो वाडेगाव, भोर वस्ती, ता हवेली जि पुणे), ओंकार अंकुश लांडगे (वय 25 वर्षे रा.मु.पो वाडेगाव ता हवेली जि पुणे), दत्तात्रय भरत गाडे (वय 25 वर्ष धंदा चालक मु पो चंदनवाडी, बोरी भडक ता दौंड जिल्हा पुणे), प्रताप अंकुश अडसूळ (वय 22 वर्ष धंदा, नोकरी रा. तळवाडी चौक, हरी जीवन हॉस्पिटल मागे, उरुळी कांचन ता हवेली जि पुणे), महेंद्र दत्तात्रय गाडे (वय 23 वर्ष धंदा नोकरी रा.मु.पो पुसेवस्ती, साईनगर उरुळी कांचन ता. हवेली जि पुणे) यांना अटक केली आहे.

आरोपींना करून त्यांची 7 दिवस पोलीस कस्टडीची रिमांड घेतली आहे. आरोपींकडून गुन्हा करण्यासाठी वापरलेली 1 चार चाकी, 3 दुचाकी वाहने, हवेत गोळीबार करण्यासाठी वापरलेले 1 अग्निशस्त्र, 1 जिवंत काडतूस असा एकूण 5 लाख 97 हजर रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र गोडसे हे करीत आहे.

सदरची कामगिरी मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, हिम्मत जाधव, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 पुणे शहर, प्रांजली सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जेराव कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर, सहायक पोलीस निरीक्षक, रविंद्र गोडसे, पोलीस अमलदार अजित फरांदे, कैलास साळुंखे, स्वप्नील जाधव, सागर जगताप, अमोल ढोणे, शुभम चिनके, मल्हारी सपुरे, सुधीर शिवले, गणेश दळवी यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments