इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणी काळभोर, (पुणे) : वाघोलीतील गांजा विक्री प्रकरणात पाहिजेअसलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट-6 च्या पथकाने अटक केली आहे. रिझवान इस्माईल शेख (वय 39, रा. गोरे वस्ती, वाघोली, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. 27) गुन्हे शाखा युनिट 6 चे पथक वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत असताना पोलीस अंमलदार रमेश मेमाणे आणि नितीन धाडगे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एनडीपीएस कायद्यातील पाहिजे असलेला आरोपी रिझवान शेख हा वाघोली येथील गोरे वस्ती येथे येणार आहे.
दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ कारवाई करत सापळा रचला आणि खात्रीशीर माहितीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्याला लोणीकंद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई प्रभारी पोलीस निरीक्षक छगन कापसे, रमेश मेमाणे, नितीन धाडगे, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांदळे यांच्या पथकाने केली.