Tuesday, December 3, 2024
Homeक्राईम न्यूजवाघोलीत विभक्त राहणाऱ्या पत्नीने केली पतीच्या घरी चोरी कपडेही जाळले; चौघांवर गुन्हा...

वाघोलीत विभक्त राहणाऱ्या पत्नीने केली पतीच्या घरी चोरी कपडेही जाळले; चौघांवर गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वाघोली : पुण्यातील वाघोली येथून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. कौटुंबिक वादातून विभक्त राहणाऱ्या पत्नीने पतीच्या घराचे कुलूप तोडून घरातील मौल्यवान वस्तू चोरून नेत पतीचे कपडे जाळल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी पत्नीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पती अनय सूर्यकांत कांबळे (वय-३७, रा. वाडेफाटा) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रेणुका कांबळे ऊर्फ रेणुका सिद्धाप्पा सन्नाके, जनाबाई सिद्धप्पा सन्नाके, सुरेश सिद्धप्पा सन्नाके, आकाश सिद्धप्पा सन्नाके (सर्व रा. सोलापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातून पती-पत्नी एकमेकांपासून वेगळे राहत होते. पत्नीने माहेरच्या तीन व्यक्तींना घेऊन तिच्या पतीच्या घरी येऊन त्याच्या घराचे कुलूप तोडले. घरामध्ये बेकायदेशीर प्रवेश करून घरातील तब्बल दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, लॅपटॉप आणि मोबाईल चोरून नेले आहेत. तसेच तिने पतीचे रोजच्या वापरातील कपडे जाळले. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments