इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
वाघोली, (पुणे) : वाघोली परिसरात अज्ञात तीन इसमांनी सोसायटीव परिसरात लावलेल्या चार वाहनांच्या काचा फोडून परिसरात दहशत माजवल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी (ता. 24) रात्री साडेदहा ते मंगळवारी पहाटे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास आनंदनगर एस.टी. कॉलनी सोसायटी, वाघोली येथे हि घटना घडली आहे. अचानक मध्यरात्री घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रकरणी ज्ञानदेव मच्छिंद्र म्हेत्रे (वय 53, धंदा किराणा व्यवसाय रा. आनंदनगर एस.टी. कॉलनी सोसायटी वाघोली, ता. हवेली) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानदेव म्हेत्रे हे किराणा दुकान व्यावसायीक असून आनंदनगर एस.टी. कॉलनी सोसायटीत राहतात. 2017 मध्ये बाहेरगावी जाणे-येणे करण्यासाठी त्यांनी मारुती सुझुकी कंपणीची इको गाडी MH 12 NU 1247 ही विकत घेतली होती. तसेच किराणा माल आणण्यासाठी कामी टेम्पो क्र MH 12 JF 6358 हा विकत घेतला होता. ते हि दोन्ही वाहने दररोज राहत्या घराच्या खाली पार्क करीत असतात.
सोमवारी (ता. 24) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कुटुंबासह जेवन खावन करून झोपी गेले होते. पहाटे दोन वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या खाली मोठा गोंधळ आणि आरडाओरड ऐकू आल्याने त्यांनी बाहेर पाहिले. यावेळी अनोळखी इसम हातात लोखंडी शस्त्र घेऊन गाड्यांच्या काचा फोडत होते. एका नागरिकाने सांगीतले की, एक अनोळखी इसम हातामध्ये कोणतेतरी लोखंडी शस्त्र घेवुन गाड्यांचच्या काचा फोड़त मोठ्याने आरडाओरडा करत हातातील लोखंडी शस्त्र हवेत फिरवुन, दहशत करत होता.
यामध्ये म्हेत्रे यांची मारुती सुझुकी व टेम्पो या वाहनांच्या काचाही फोडण्यात आल्या. तसेच, घरापासुन काही अंतरावर असलेले शिवाजी शिंदे यांची रिक्षा (MH 14 V 6721) व लक्ष्मण पांचाळ यांच्या पिकअप (MH 12 VF 7995) यांच्यावरही दगडफेक करून नुकसान करण्यात आले. असल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. या हल्ल्यामध्ये तीन अनोळखी इसम सामील होते. काचा फोडल्यानंतर ते मोटारसायकलवर बसून पळून गेले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. वाघोली पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.