Monday, December 11, 2023
Home क्राईम न्यूज वहीदा रहमान यांच्याबद्दल रत्ना पाठक यांचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या " पुरस्कार देऊन...

वहीदा रहमान यांच्याबद्दल रत्ना पाठक यांचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या ” पुरस्कार देऊन एका कोपऱ्यात..”

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या पत्नी आणि दिग्गज अभिनेत्री रत्ना पाठक शाह सध्या त्यांच्या आगामी ‘धक धक’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यांवर मनमोकळी मतं मांडली आहेत. रत्ना यांनी हेसुद्धा सांगितलं की त्यांनी ‘धक धक’ या चित्रपटातील भूमिकेसाठी वयाच्या 65 व्या वर्षी बाईक चालवायला शिकल्या. त्याचसोबत फिल्म इंडस्ट्रीतील काही ज्येष्ठ अभिनेत्रींना काम मिळत नसल्याचीही तक्रार त्यांनी यावेळी केली.

” पुरस्कार तुम्ही तुमच्याकडेच ठेवा”

ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान यांना नुकताच प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. मात्र या पुरस्कारावरून रत्ना यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. “महान कलाकारांना फक्त पुरस्कार देणंच पुरेसं नसतं, त्यांना कामसुद्धा मिळालं पाहिजे”, असं त्या म्हणाल्या. फिल्म कम्पॅनियनला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “जेव्हा मी मेरिल स्ट्रीप (74 वर्षे) आणि हेलन मिरेन (78 वर्षे) यांना पाहते तेव्हा मला वाटतं की जर ते असं करू शकतात, तर मीसुद्धा करू शकते. मला याची खंत वाटते की आपल्या देशात वहीदा रहमान यांना तशा भूमिका मिळत नाहीत, ज्या त्यांना खऱ्या अर्थाने मिळाल्या पाहिजेत. त्या खूप दमदार अभिनेत्री आहेत. त्यांना फक्त इतकंच करायचं आहे की एखादा छोटासा पुरस्कार देऊन त्यांना एका कोपऱ्यात बसवायचं आहे. खरंच का? कृपया त्यांना चांगल्या भूमिकांची ऑफर द्या. पुरस्कार तुम्ही स्वतःकडेच ठेवा. ”

” अभिनेत्रीला शेल्फ लाइफ नसते”

“आपण कसे दिसतोय या गोष्टीशी तुम्हाला तडजोड करावीच लागेल. हे सत्य आहे की तुमचं शरीर सतत बदलत जाणार आणि जर मला त्याच्याशी फार छेडछाड करायची नसेल तर मी कोण आहे याचा स्वीकार तुम्हाला करावा लागेल. एक महिला म्हणून मी विचार करायची ही अभिनय करण्याची एक शेल्फ लाइफ असते. जोपर्यंत मी सुंदर दिसेन तोपर्यंत मी अभिनय करू शकेन आणि त्यानंतर दुसरं काहीतरी करेन असं मला वाटायचं. मलाच माझ्या या विचारांवर विश्वास बसत नाही. पण हे खरं आहे, एकेकाळी मीसुद्धा असा विचार केला होता”, असंही त्या पुढे म्हणाल्या.

RELATED ARTICLES

महाराष्ट्रानंतर आता या राज्यातही दोन उपमुख्यमंत्री, भाजपचा मोठा निर्णय

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) MP New CM : मध्य प्रदेशात भाजपने ऐतिहासिक विजया मिळवल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आता यावरील...

‘या’ बँकेत भरती प्रक्रिया सुरू, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई : पदवीधरांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयात पदवी घेतली असेल तरीही तुम्हाला थेट बँकेत नोकरी...

पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा नाही अंकुश, प्रशासनाबाबत तक्रारी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : महापालिकेच्या कारभारावर आयुक्तांचा अंकुश नसल्याचा आरोप होत आहे. विविध विभागांचे प्रमुख तसेच अधिकारी काम करत नसल्याच्या तक्रारी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्रानंतर आता या राज्यातही दोन उपमुख्यमंत्री, भाजपचा मोठा निर्णय

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) MP New CM : मध्य प्रदेशात भाजपने ऐतिहासिक विजया मिळवल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आता यावरील...

‘या’ बँकेत भरती प्रक्रिया सुरू, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई : पदवीधरांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयात पदवी घेतली असेल तरीही तुम्हाला थेट बँकेत नोकरी...

पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा नाही अंकुश, प्रशासनाबाबत तक्रारी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : महापालिकेच्या कारभारावर आयुक्तांचा अंकुश नसल्याचा आरोप होत आहे. विविध विभागांचे प्रमुख तसेच अधिकारी काम करत नसल्याच्या तक्रारी...

एक दिवसासाठी काम बदलले अन् जीव वाचला! आगीतून वाचलेल्या रेणुका ताथोड यांची ‘आपबीती’

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : "दररोज स्पार्कल कँडलला स्टिकर लावण्याचे काम करायचे. पण, शुक्रवारी स्पार्कल कँडलला टोपण लावायचे काम दिले. त्यामुळे आग...

Recent Comments