Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज वर्क फ्रॉम होम भोवले, तरुणीने सहा लाख गमावलेः टेलिग्रामवर ओळख करून...

वर्क फ्रॉम होम भोवले, तरुणीने सहा लाख गमावलेः टेलिग्रामवर ओळख करून पार्टटाइम नोकरीचे दिले आमिष

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

टेलिग्रामवर ओळख करून पार्ट टाइम नोकरीचे आमिष दाखवण्यात आले. दिलेले टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून युवतीला तब्बल ६ लाख रुपयांना गंडा घातला गेला.

हडपसर परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय युवतीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार १२ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर २०२३ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, तक्रारदार युवतीला अनोळखी मोबाइलवरून मेसेज आला. टास्क पूर्ण केल्यास १५० ते २०० रुपये मिळतील, असे सांगितले. सुरुवातीला मोबदला देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर गुंतवणुकीचे आमिष दाखवून प्रीपेड टास्कच्या नावाखाली एकूण ६ लाख ६ हजार रुपये उकळले. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक संदीप शिवले पुढील तपास करत आहेत.

रिव्ह्यूच्या नादात महिलेने गमावले तीन लाख

गुगल लिंक पाठवून त्याला रिव्ह्यू दिल्यास चांगला मोबदला देतो, असे सांगत एका महिलेची फसवणूक केली. याबाबत उंड्री येथे राहणाऱ्या ४३ वर्षीय महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेला अनोळखी मोबाइलवरून मेसेज आला. त्यात गुगल लिंक पाठवून त्याला रिव्ह्यू दिल्यास मोबदला मिळेल, असे लिहिले होते. त्यानंतर तक्रारदार महिलेला एका टेलिग्राम ग्रुपमध्ये अॅड केले. महिलेने रिव्ह्यू देऊन स्क्रिनशॉट पाठविल्यावर काही प्रमाणात मोबदला देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर प्रीपेड टास्क आणि अधिक नफा मिळेल, असे आमिष दाखवून महिलेला २ लाख ८६ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक एस भोसले करत आहेत.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments