इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मनमाड (नाशिक) : वरिष्ठांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप करीतमालाडमधील कुरार पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी सुभाष परशराम कांगणे (३६, मूळ राहणार मुखेड) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पार्थिवावर मनमाड येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. कांगणे यांनी सुसाइड नोट लिहिली असून त्यात आपल्या नावाने वरिष्ठ अधिकाऱ्याने खोटा अर्ज देऊन, मानसिक त्रास दिला जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सुभाष कांगणे यांची मनमाड ही सासुरवाडी आहे. ते कुरार पोलीस ठाण्यात कार्यरत होते. कांगणे यांची ही सुसाईड नोट व्हायरल झाली आहे. माझ्या नावाने ३ जानेवारी रोजी कोणीतरी खोटा तक्रार अर्ज दाखल केला. या अर्जात वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर आरोप केले गेले आहेत. माझा संबंध नसताना या अर्जामुळे माझी बदनामी झाली आहे. त्यामुळे आपण जीवन संपवत आहोत, असे नमूद करीत कांगणे यांनी याप्रकरणी तेथील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या नावाचा उल्लेख या चिठ्ठीत केला आहे.