Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजवराह विक्रीचे पैसे मागितल्याच्या रागातून दोघांवर कोयत्याने वारः पुण्यातील रामटेकडी परिसरात ...

वराह विक्रीचे पैसे मागितल्याच्या रागातून दोघांवर कोयत्याने वारः पुण्यातील रामटेकडी परिसरात टोळक्याचा राडा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वराह विक्रीचे पैसे मागितल्याच्या रागातून नउ जणांच्या टोळक्याने महिलेसह दोघांवर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर दगड आणि वीटा मारून दहशत निर्माण करण्याची प्रयत्न केल्याची घटना रामटेकडी परिसरात घडली आहे.

संजूसिंग पंजाबसिंग कल्याणी, पंजाबसिंग फौजिींसग कल्याणी, बिरसिंग पंजाबसिंग कल्याणी, संदीपसिंग पंजाबसिंग कल्याणी, कृष्णिंसग पंजाबसिंग कल्याणी, बलराजसिंग बिरसिंग कल्याणी, राजबीरसिंग कल्याणी, धनराजसिंग कल्याणी, निहालसिंग कल्याणी अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. बसंतीकौर शामसिंग कल्याणी (वय ५०) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसंतीकौर यांचा मुलगा निहालसिंग याने शेजारी राहणाऱ्या संजूसिंगला वराहची विक्री केली होती. त्याचे पैसे मागितल्याच्या रागातून नउ जणांनी हातात कोयते, पालघन घेउन जमाव जमविला. बसंतीकौरसह कुटूंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. संजूसिंगने बसंतीकौरवर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले. दुसरा वार मुलगा रविसिंगवर केल्याने तो जखमी झाला. त्यानंतर टोळक्याने बसंतीसिंगवर दगड-गोटे मारून जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे पुढील तपास करीत आहेत.

दुचाकीवरील अज्ञाताकडून मंगळसूत्र चोरी

किराणा साहित्य घेउन घरी चाललेल्या एका महिलेच्या गळ्यातील ४० हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार आलेल्या अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना कोंढव्यातील बुरकफिल्ड विलोज सोसायटी परिसरात घडली आहे. त्यानंतर काही अंतरावर चोरट्यांनी पुन्हा एका महिलेच्या गळ्यातील ५० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले आहे. याचसोबत बाणेर रस्ता परिसरातून जाणाऱ्या तरूणाचा पाठलाग करून दुचाकीस्वार आलेल्या अनोळखी चोरट्यांनी त्याच्या गळ्यातील ८० हजारांची सोन्याची चेन जबरदस्तीने चोरून नेली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments