Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज वय ८४ असले तरी ते ज्या जिद्दीने लढतायेत ते आदर्श घेण्यासारखेच; सुप्रिया...

वय ८४ असले तरी ते ज्या जिद्दीने लढतायेत ते आदर्श घेण्यासारखेच; सुप्रिया सुळेंची नाव न घेता टीका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : शरद पवार यांचे वय ८४ असले तरी कोणीही आदर्श घ्यावा असेच त्यांचे काम आहे. ते ज्या जिद्दीने लढत आहेत, तेही आदर्श घेण्यासारखेच आहे, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे थेट नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

खासदार सुळे यांनी सोमवारी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेत शहरातील समस्यांवर चर्चा केली. पाणी, कचरा, वाहतूक या प्रश्नांवर महापालिका प्रशासनाने नगरविकास विभाग, सिंचन विभाग यांच्याबरोबर संपर्क साधून ठोस काम करावे, अशी मागणीही त्यांनी आयुक्तांकडे केली.

याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना ‘अजित पवार यांच्याकडून आक्रमकपणे टीका केली जाते; मात्र शरद पवार यांच्याकडून कोणतेही उत्तर दिले जात नाही. त्यामुळे पवार कुटुंबीय कुठे तरी एकत्र आहे का? असा प्रश्न निर्माण होतो.’ असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावर खा. सुळे म्हणाल्या की, मी राजकारणात आरेला कारे करण्यासाठी आले नाही. मी यशवंतराव चव्हाण यांच्या कारकिर्दीत वाढलेली एक सामाजिक कार्यकर्ता आहे. आरेला कारे करणं सोपं आहे; मात्र शांत बसून सहन करणं फार अवघड असतं असा मला वाटतं.

अॅड. आंबेडकरांना संसदेत पाहायला आवडेल

प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत आले तर मनापासून आनंद होईल. त्यांना संसदेत पाहायला मला आवडेल. लवकरच इंडिया आघाडीचे नियोजन जाहीर करू. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाचे नियोजन देखील लवकर केले जाईल, असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments