Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज वयोवृद्ध नागरिकास मारहाण करत लुटणाच्या प्रयत्नः आरोपी गजाआड; पुण्याच्या हडपसर परिसरातील घटना

वयोवृद्ध नागरिकास मारहाण करत लुटणाच्या प्रयत्नः आरोपी गजाआड; पुण्याच्या हडपसर परिसरातील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

रात्री कामावरून पायी घरी निघालेल्या वयोवृद्ध नागरिकाला जबरीने लुबाडण्याचा प्रयत्न करून मारहाण करणाऱ्या दोघांना हडपसर पोलिसांनी गजाआड केल्याची माहिती दिली आहे. रोहितसिंग जितेंद्रसिंग टाक (वय-19), कमलेश नरेंद्र भोर (वय-22, रा. दोघेही हिंगणमळा, ससाणेनगर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.

तक्रारदार हे 15 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता काम संपवून हडपसर भागातून काळेपडळ येथून पायी जात होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपी रोहितसिंग टाक आणि कमलेश भोर हे फिर्यादी जवळ येऊन पैसे काढ म्हून त्यांच्या खिशात हात घातला.

यावेळी तक्रारदार यांनी पैसे देण्यास नकार दिला असता आरोपींनी त्यांना लाथा बुक्क्याने मारहाण करून तोंडाचा जबडा आणि डावा पाय फॅक्चर करून गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तांत्रिक तपासाच्या आधारे आणि गोपनीय बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे टाक आणि भोर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके, पोलिस निरीक्षक विश्वास ढगळे, संदीप शिवले, सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलिस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलिस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतीबा पवार, सचिन जाधव, प्रशांत टोणपे आदींच्या पथकाने केली आहे. याबाबत पुढील तपास हडपसर पोलिस करत आहे.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments