इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
उन्हाची दाहकता वाढत असल्याने वन्य प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांजवळ येत आहेत. यातून बऱ्याचदा त्यांचा मानवाशी संघर्ष होतो. कधी कधी रस्ते ओलांडताना अपघात होतात, म्हणून ज्ञानदीप ग्रंथालय पाटस व विद्यार्थी सेवा संघ यांच्या संकल्पनेतून दौंड व बारामती तालुक्यातील अभयारण्य परिसरात मुक्या प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. पाटस येथील ज्ञानदीप ग्रंथालय प व विद्यार्थी सेवा संघाचे पाणी अभियान अंतर्गत उन्हाच्या वाढत्या चटक्याने वनक्षेत्र व माळरानावर वावरणाऱ्या वन्यजीवांची पाण्यासाठी वणवण होते त्यांना उन्हाच्या तीव्रतेत परिसरात भटकावे लागते आहे यामुळे काही वन्यप्राणी मृत्यूमुखी पडण्याची भीती निर्माण होत आहे.
वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीच्या उद्देशाने पाटस येथील ज्ञानदीप ग्रंथालय व विद्यार्थी सेवा संघ यांच्या माध्यमातून “पाणी अभियान” राबविण्यात आले आहे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून हिंगणी गाडा, रोटी वनक्षेत्राच्या हद्दीतील ससे, हरीण, काळवीट, मोर व इतर वन्यप्राणी तसेच पक्षांच्या पिण्याच्या पाण्यासाठी येथील कृत्रिम पाणवठ्यात सुमारे ६ हजार लिटर पाणी सोडण्यात आले, यामुळे यावनक्षेत्रातील प्राणी व पक्ष्यांची पाण्यासाठी होणारी वणवण काही अंशी तरी कमी झाली असून यापुढच्या काळातही पाटस, रोटी, हिंगणी, कुसेगाव व सुपे परिसरातील वनक्षेत्रात कृत्रिम पाणवठ्यात गरजेनुसार ज्ञानदीप ग्रंथालय व विद्यार्थी सेवा संघ पाणी सोडणार असल्याचे संस्थेच्या पदाधिकारी यांनी सांगितले असून अशा प्रकारच्या सामाजिक बांधिलकीतुन महापुरुषांच्या पुण्यस्मरण व जयंती साजरी करणे ही काळाची गरज असल्याचे आहे. यावेळी ज्ञानदीप ग्रंथालयचे पदाधिकारी हर्षद बंदीष्टी, प्रमोद ढमाले, गौतम पानसरे, राज मुलाणी तसेच सामाजिक कार्यकर्ते विनोद कुरूमकर, विठ्ठल वाळुंजकर, राजू गोसावी, संतोष खरात, वन अधिकारी रामेश्वर तेलंगरे, बाबा कोकरे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.