इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याची घटना वडगावशेरी भागात घडली आहे. याबाबत चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एम. ए. सुमित्रा बाबू (वय 64 वर्ष) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यातदार महिला या पुण्यातील वडगाव शेरी येथील बालाजीनगर परिसरात वास्तव्यास आहेत. रविवारी 27 जुलै रोजी सायंकाळी 9 वाजण्याच्या सुमारास भाजी खरेदी करून त्या आपल्या मैत्रिणीसोबत घरी पायी जात होत्या. तेंव्हा समोरून एक दुचाकी आली त्यावर मागे बसलेल्या अज्ञात चोरट्याने तक्रारदार महिलेच्या गळ्यातील 60 हजारांची सोनसाखळी हिसकावली. सोनसाखळी चोरून चोरटे घटनास्थळावरून पाळता भुई झाले. याबाबत महिलेने पोलिसांत तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक असवले अधिक तपास करीत आहेत.