Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजलोहगाव विमानतळाच्या बाहेर संत तुकाराम महाराजांचा वैकुंठगमन पुतळा उभारा; केंद्रीय मंत्री मुरलीधर...

लोहगाव विमानतळाच्या बाहेर संत तुकाराम महाराजांचा वैकुंठगमन पुतळा उभारा; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोणीकंद : पुणे (लोहगाव) विमानतळाबाहेर संत तुकाराम महाराजांचा वैकुंठगमन पुतळा उभारावा, अशी मागणी लोणीकंद येथील भाजप सांस्कृतिक आघाडीचे उपाध्यक्ष योगीराज शिंदे यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनानुसार, जगतगुरू संत तुकाराम महाराजांचे आजोळ लोहगाव होते. महाराजांचे वास्तव्य होते. तसेच जगातील एकमेव संत तुकाराम महाराज आहेत, कि वैकुंठला जाताना विमान नेण्यासाठी आले होते. त्यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या भूमीत भव्य दिव्य वैकुंठगमन पुतळा विमानतळ बाहेर उभारावा ही तमाम वारकरी संप्रदायची ईच्छा आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, शिंदे हे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार बाळा भेगडे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, प्रिया बेर्डे, जयश्री पलांडे, दादासाहेब सातव, संदीप भोंडवे, रविंद्र कंद यांच्या मार्गदर्शनाखाली योगीराज शिंदे काम करतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments