Tuesday, October 29, 2024
Homeक्राईम न्यूजलोणी स्टेशन येथील बहुचर्चित मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा; मटकाचालकासह दोघांवर गुन्हा दाखल

लोणी स्टेशन येथील बहुचर्चित मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा; मटकाचालकासह दोघांवर गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन चौकाजवळील एका झाडाच्या आडोशाला खुलेआम सुरु असलेल्या व बहुचर्चित मटका जुगाराच्या अड्ड्यावर दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक 2 ने बुधवारी (ता. 2) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी मटकाचालकासह दोघांवर गुन्हा दाखल करून सुमारे 2 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संतोष नारायण शुक्ला (वय-53, रा. प्यासा हॉटेलच्या मागे, लोणी काळभोर रेल्वे स्टेशन, लोणी काळभोर, पुणे) व किरण सोपान तुपारे (वय 50, रा. घोरपडेवस्ती लोणी स्टेशन ता. हवेली जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार गणेश मधुकर गोसावी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सरकारच्या वतीने फिर्याद दिली आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश गोसावी हे पोलीस हवालदार असून ते पुणे शहर गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक क्रमांक 2 मध्ये कार्यरत आहेत. गणेश गोसावी हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना लोणी स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यालगत मनोहर क्लॉथ सेंटरचे समोर असलेल्या एका झाडाच्या आडोशाला खुलेआम मटका जुगार सुरू आहे. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, त्या ठिकाणी मटका चालक संतोष शुक्ला व किरण तुपारे हे कल्याण मटका जुगारावर पैसे लावुन मटका खेळवित असताना आढळून आले. पोलिसांनी या छाप्यात 2 हजार 850 रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केले आहे. याप्रकरणी गणेश गोसावी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात संतोष शुक्ला व किरण तुपारे यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 112 व महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार योगेश कुंभार करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments