Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजलोणी देवकर येथे दोन वेगवेगळ्या अपघातात दोघींचा मृत्यू

लोणी देवकर येथे दोन वेगवेगळ्या अपघातात दोघींचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

इंदापूर – इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवस झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

याबाबत शिल्पा संदीप धापटे (वय 27 वर्षे, रा. रुई मराडेवाडी, ता. इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रविवार (ता. 21) रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान फिर्यादी या त्यांचे ताब्यातील स्कूटी गाडी (नंबर MH42 AY 2232) हीचे वरून आपल्या आजी छबाबाई सोमनाथ गावडे (वय 70 वर्षे, रा. पारवडी, ता. बारामती, जि. पुणे) यांचेसह इंदापूर वरून मराडवाडी कडे जात असताना मौजे लोणी देवकर (ता. इंदापूर) गावचे हद्दीत हॉटेल रोकडेचे समोर रोडवर अचानक एका पिवळ्या रंगाचे जेसीपी वाहनावरील अज्ञात चालकाने रोडचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून समोर न पाहता भरधाव वेगात येऊन अचानक फिर्यादीचे गाडीला डावी बाजूंनी जोराचे धडक देऊन अपघात करून फिर्यादीचे हाताला पायाला डोक्याला दुखापत झाली. तर फिर्यादीचे आजीचे दोन्ही पायाला हाताला गंभीर व किरकोळ जखमा होऊन आजीचा मृत्यू झाला. यावरून अज्ञात जेसीबी चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या घटनेत कांतीलाल गेना तरंगे (वय 37 वर्षे, रा. तरंगवाडी, ता. इंदापुर) यांनी दिलेल्या फिर्यादनुसार सोमवार (ता. 22) रोजी दुपारी 12 च्या दरम्यान चुलत भाऊ शंकर मोहन तरंगे हा त्याची आई विमल मोहन तरंगे (वय 55 वर्षे, रा. तरंगवाडी, ता. इदापुर, जि. पुणे) यांना घेऊन त्यांच्याकडील दुचाकी (क्र. एम एच 42 बी ए 4255) वरुन पुणे सोलापुर हायवे वर पुणे बाजुकडे जात असताना मौजे लोणीदेवकर गावच्या हद्दीत ब्रीजवरुन जात असताना पाठीमागुन येणारे सेलोरो गाडी (क्र. एम एच 14 जे यु 4705) यावरील चालक नाव पत्ता माहीत नाही याने त्याचे ताब्यातील वाहन हयगयीने चालवून मोटारसायकलला पाठीमागुन ठोस दिल्याने झालेल्या अपघातामध्ये शंकर तरंगे याचे दुखापत तसेच फिर्यादीची चुलती विमल मोहन तरंगे यांचा मृत्यू झाला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोन्ही घटनांचा पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक राउत हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments