Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजलोणी काळभोर, सासवडपर्यंत धावणार मेट्रो, प्रकल्प अहवालास पुणे महापालिकेची मंजुरी

लोणी काळभोर, सासवडपर्यंत धावणार मेट्रो, प्रकल्प अहवालास पुणे महापालिकेची मंजुरी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : शहरात सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या मार्गिकांना मिळत असलेला मोठा प्रतिसाद पाहता आणखी दोन नवीन मेट्रोच्या विस्तारित मार्गिकेच्या सविस्तर प्रकल्प अहवालास पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाच्या हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड रेल्वे स्टेशन या नवीन मार्गिकच्या अहवालास मान्यता देण्यात आली आहे. या नवीन मेट्रो मार्गामुळे पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला पोहोचण्यास संधी मिळणार आहे.

पुणे शहरातील दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या तसेच त्यामध्ये दररोज ९०० ते १००० वाहनांचा नव्याने समावेश होत आहे. पुणे शहरात येणारे व शहरातून बाहेर जाणाऱ्या छोट्या-मोठ्या वाहनांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर प्रचंड वाहतूककोंडी ही नित्याची बाब झालेली आहे. सन २०११च्या जनगणनेनुसार पुणे शहराची लोकसंख्या ३३.७१ लाख होती. नव्याने २३ गावे समावेशानंतर शहराचे क्षेत्रफळ सुमारे ५०० चौ. कि.मी. पेक्षा जास्त झाले असून, लोकसंख्या सुमारे ४५ ते ५० लाख इतकी आहे. २३ गावांच्या समावेशानंतर पुणे हे भारतातील क्षेत्रफळानुसार दुसऱ्या क्रमांकाचे शहर झाले आहे.

सार्वजनिक वाहतूक समस्या सोडविण्याच्या विविध उपाययोजनांपैकी नागरिकांचा वैयक्तिक वाहन वापर कमी करण्यासाठी मेट्रो रेल ही वेगवान, प्रदूषणमुक्त, विनाअडथळा, इंधन व वेळेची बचत करणारी, पार्किंग क्षेत्र कमी करणारी आणि मोठी वाहनक्षमता असलेली सार्वजनिक वाहतूक सुविधा पुणे महानगरासाठी उपलब्ध होणार आहे. प्रकल्पापैकी हडपसर ते लोणी काळभोर या प्रकल्पाची लांबी ११.३५ किमी असून त्यामध्ये १० स्टेशनचा समावेश करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments