Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजलोणी काळभोर व कदमवाकवस्तीत टोळीयुद्ध पेटले; दोन टोळक्याने राडा घालून पाच दुचाकी...

लोणी काळभोर व कदमवाकवस्तीत टोळीयुद्ध पेटले; दोन टोळक्याने राडा घालून पाच दुचाकी फोडल्या

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोणी काळभोर : जुन्या वादातून 10 ते 12 जणांच्या दोन टोळक्याने पाच दुचाकींचा चक्काचूर केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर व कदमवाकवस्तीत शनिवारी (ता. 23) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. तर टोळके दुचाकी फोडतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन टोळक्यांमध्ये मागील काही दिवसापूर्वी वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून एका टोळक्याने लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा व कदमवाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील इंदिरा नगर परिसरात हातात कोयता घेऊन दहशत माजविली. तसेच रस्त्याच्या कडेला लावलेल्या 3 दुचाकी फोडल्या.

आपल्या परिसरात येवून दहशत माजाविल्याप्रकरणी 6 जणांचे टोळके हातात कोयता घेऊन त्यांना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लातूर बँकेच्या पाठीमागे आले, मात्र तेथे ते आढळून न आल्याने या दुचाकीवरून आलेल्या 6 जणांच्या टोळक्याने रस्त्यावरील दोन दुचाकी फोडल्या. टोळके दुचाकी फोडतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

दरम्यान, दोन्ही टोळक्याच्या हातात कोयत्यासारखे तीष्ण हत्यार असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात दिसत आहेत. मात्र टोळक्याने लोणी काळभोर व कदमवाकवस्तीत गाड्या फोडून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. मात्र टोळक्याच्या भांडणाच्या नादात नागरिकांच्या 5 गाड्यांच्या विनाकारण मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींना ताब्यात घेण्याचे काम सुरु आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments