Tuesday, September 10, 2024
Homeक्राईम न्यूजलोणी काळभोर येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 3 जणांवर गुन्हा दाखल

लोणी काळभोर येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 3 जणांवर गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोणी काळभोर लोणी काळभोर पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाईचा बगाडा उगारला आहे. मागील पाच दिवसापूर्वी लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बेट परिसरात खुलेआम सुरु असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता. पोलिसांनी या कारवाईत 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ताजी असतानाच, आता लोणी काळभोर येथील मराठी शाळेच्या समोर असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये खुलेआम सुरु असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी बुधवारी (ता.21) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संभाजीराजे सोपान काळभोर (वय 55, रा. बाजारमळा, लोणी काळभोर), मच्छिंद्र शंकर जाधव (वय 45, धंदा ड्रायव्हर रा. आंबरनाथ मंदिराजवळ लोणी काळभोर ता. हवेली) व वसंत आनंद सोनवणे (वय 70, बौद्धवस्ती, पाण्याच्या टाकीजवळ लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार संदीप किसन धुमाळ यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार संदीप धुमाळ हे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावीत असताना, त्यांना लोणी काळभोर येथील सोनवणे यांच्या खोलीत अवैध जुगार अड्डा सुरु आहे, अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने लोणी काळभोर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा वरील तीनजण संगनमत करुन 52 पानी पत्त्याचा जुगार चालवत असताना मिळून आले.

पोलिसांनी त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. तर, तीनही आरोपींवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार केतन धेंडे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments