इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणी काळभोर, (पुणे): झाडाच्या फांद्या तसेच लाईन मेंटेनन्स करितालोणी काळभोर परिसरातील वीजपुरवठा आज गुरुवारी (ता. 10) सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतठा बंद राहणार आहे. अशी माहिती लोणी काळभोर महावितरण कार्यालयाकडून देण्यात आली आहे. तरी ग्राहकांनी संयम बाळगावा असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आलेले आहे.
लोणी काळभोर विद्युत यंत्रणेची देखभाल व दुरुस्तीची कार्ये आज केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर विद्युत यंत्रणेला लागलेल्या झाडाच्या फांद्या काढण्यासह विद्युत वाहिन्या व यंत्रणेची देखभाल दुरुस्तीच्या कामांना महावितरणातर्फे सुरवात करण्यात आली आहे. यामध्ये विद्युत यंत्रणेला स्पर्श करीत असलेल्या झाडांच्या फांद्या तोडणे, फुटलेले पीन आणि इन्सुलेटर बदलणे, तपासणी व दुरुस्त करणे, रोहित्रांचे ऑइल तपासणी, ऑइल गळती थांबवणे, वाहिनींचे खराब झालेले लाईटनिंग अरेस्टर बदली करणे, भूमिगत वाहनांचे तात्पुरती असलेले जॉइंट कायमस्वरूपी करणे, वाहिन्यांचे खराब झालेले जंपर बदली करणे, जीर्ण झालेल्या वायर बदल, जळालेल्या तुटलेल्या वायर बदल तसेच उपकेंद्रातील सर्व यंत्रांची तपासणी केली जाणार आहे.